सणसवाडीत कंपनीकडून खंडणी घेणारे दोघे जेरबंद

( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथील एका कंपनीत व्यवस्थापकाला धमकी देत माथाडी कामगारांचा ठेका मागून ठेका द्या अन्यथा कंपनी बंद पाडू असे म्हणून खंडणी मागणाऱ्या दोघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत राजू मनोहर दरेकर व निखील नामदेव खेंगत या दोन खंडणीखोरांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली आहे.

                         सणसवाडी ता. शिरुर येथील एसबीएस इलेक्ट्रोप्लेटर्स आणि वरनादा इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड यांना कंपनीमध्ये राजू दरेकर व निखील खेंगट या दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनी मध्ये वारंवार जाऊन कंपनीचे व्यवस्थापक दयानंद तिवारी यांना भेटून आम्हाला कंपनीमध्ये माथाडी कामगारांचा ठेका द्या नाहीतर महिन्याला तेहतीस हजार रुपये द्या असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारुन कंपनी बंद पाडण्याची धमकी दिली. त्यांनतर वारंवार दोघेजण कंपनीमध्ये येऊन धमकी देत असल्याने तिवारी घे घाबरून गेल्याने त्यांनी दोन महिल्याचे सहासष्ट हजार रुपये निखील खेंगट याच्या खात्यावर पाठवले, त्यांनतर पुन्हा दोघे त्रास देत अल्स्याने तिवारी यांची कंपनीचे मालक प्रकाश भट्ट यांच्याशी चर्चा केली, याबाबत कंपनीचे व्यवस्थापक दयानंद रामसकल तिवारी वय ५९ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी राजू मनोहर दरेकर वय २६ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे व निखील नामदेव खेंगट वय २८ वर्षे रा. पारोडी ता. शिरुर जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल करत दोघांना देखील अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.