पाचोडच्या बुलढाणा अर्बन बँकेकडून मयतांच्या वारसदारांना विमा वाटप..

पाचोड (विजय चिडे) बुलढाणा अर्बन बँकेकडून मागील काही वर्षापासून बँकेत सोने तारण कर्ज घेणाऱ्या व खातेदाराची विमा पॉलिसी काढून घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत लिंबगाव ता. पैठण येथील उद्धव बाबु निर्मळ यांनी बुलढाणा अर्बन बँकेकडून एक लाख 24 हजार रुपये सोनेतारण कर्ज घेतले होते. त्यामुळे त्यांची पॉलिसी देखील बँकेने काढली होती. उद्धव बाबु निर्मळ यांचा 1 ऑक्टोबर 22 रोजी अपघाती निधन झाले असता बँकेकडून त्यांचे संपूर्ण कागदाची पूर्तता करून त्यांची पॉलिसी मंजूर करून एक लाख 45 हजार रुपये काढण्यात आली. यावेळी बँकेने सदरील मयताच्या नावावरील कर्जाची रक्कम पॉलिसी मधून कपात करून उर्वरित रक्कम ही मयताच्या वारसदाराच्या हाती देण्यात आली.

त्याच बरोबर कोळी बोडखा ता.येथील अस्लम आरेफ सय्यद यांनीही 16 हजार दोनशे रुपये सोनेतारण कर्ज बुलढाणा अर्बन बँकेकडून घेतले होते. त्यांचाही शेतामध्ये पाणी देत असताना सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.या दोन्ही घटनेची माहिती विभागीय व्यवस्थापक अधिकारी प्रभाकर कोलते यांना शाखाधिकाऱ्यांनी दिली असता त्यांनी दोन्हीही मयताच्या कागदपत्राची पूर्तता करून मुख्यालय प्रस्ताव पाठवून दोघांचेही पॉलिसी बँकेने मंजूर करून दोन्हीही मयतांच्या नावावर असणाऱ्या सोने तारण कर्ज कपात करून उर्वरित रक्कमेचा धनादेश मयतांच्या वारसदारांना पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे,अंकुशराव जावळे, ऋषींदर जावळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी ठेवीदार सभासद राजू भुमरे, कृष्णा शेळके, शाखा व्यवस्थापक हरिष खराद व कर्मचारी उपस्थित होते.