पाचोड येथे किराणा दुकानात चोरी ;४० हजार रुपये रोख लंपास"

पाचोड (विजय चिडे) पाचोड ता.येथील महालक्ष्मी किराणा दुकानाचे अज्ञात चोरट्याने शटर तोडून दुकानातील ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दादेगाव येथील गणेश शिवाजी कोल्हे यांची पाचोड येथे धुळे-सोलापूर महामार्गावर महालक्ष्मी किराणा स्टोअर असून त्यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आपली किराणा दुकान बंद करून घरी गेले असता. बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना दुकानाचे शटर उघडल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी दुकानात ठेवलेली रोख रक्कम तपासले असतात त्यातून चाळीस हजार रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा चोरीचा प्रकार दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला असून ही चोरी बुधवारी पहाटेच्यावेळी साडेचार वाजेच्या सुमारास झाल्याची दिसत आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीटजमादार अण्णासाहेब गव्हाणे, पोलीस नाईक पवन चव्हाण करीत आहेत.