वडजी येथे वीज पडून दोन बैलाचा मृत्यू 

पाचोड (विजय चिडे) वडजी ता. पैठण परिसरामध्ये आज सकाळ पासून विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या वेळी दोन बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैल मृत्युमुखीं पडल्याची घटना (दि.७)घडली असून शेतकरी रामेश्वर तुळशीराम गोजरे रा.वडजीयांचे बैल लिबाचा झाडाला बांधलेले होते. या बैलावर अचानक वीज पडून बैल जागीच ठार झाला. बैलावर वीज पडताच गावातील व परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटना घडून चार तास उलटले तरी देखील तलाठी वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसलेले शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केले आहे