पाचोड परिसरात जारचा गोरखधंदा जोमात
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
‘पाणी’ दर्जाहीन पाण्याच्या जारची सर्रास विक्री
पाचोड (विजय चिडे)कधीकाळी प्रवासात एखादी पाण्याची बाटली विकत घेणारे नागरिक आता सर्रासपणे घरात पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पाचोड ता.पैठण परिसरात पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. फेब्रुवारीपर्यंत २० रुपयाला मिळणाऱ्या २० लिटर जारची किंमत एप्रिलमध्ये ३० रुपये झाली आहे.
एक लिटर बाटलीबंद पाणी अथवा २० लिटरच्या सीलपॅक जारची विक्री करण्यासाठी ब्युराे आँफ स्टँडर्ड (बीआयएस) ची परवानगी घेणे आवश्यक असते.परंतु पाचोड ता.पैठण परिसरात सात ते आठ पाणी विक्री करण्याचा कारखाने आहे.या कारखान्यावर बीआयएसचे अधिकारी संबंधित ठिकाणी जाऊन त्यांच्या नियमांप्रमाणे कारखान्याची व्यवस्था केली की नाही ? हेही पाहणे गरजेचे ठरणार आहे. पाचोड परिसरात ब्युराे आँफ इंडियन स्टँडर्स आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या नियमावलीवर ‘पाणी फेरत’ सर्रास दर्जाहीन पाण्याची विक्री सुरू आहे.
पाचोड सह परिसरात बीआयएसचा परवाना किती व्यवसायिकांना आहे.याबाबतीत अद्यापही अधीकृत माहीती भेटलेली नाही.या परिसरात गल्लीबोळात पाण्याचा व्यवसाय बोकाळल्याने रोज लाखोंची उलाढाल सुरू आहे. बंद बाटलीसह मोठ्या जारमधील शुद्ध पाण्याचा व्यवसायही तेजीत आहे. २० लिटर पाण्याचे जार ३० रुपयांना विकले जात आहे. पाचोडसह परिसरातील खेड्यापाड्यासह छोट्या-मोठ्या कार्यालयापासून अनेक घरांपर्यंतही या जारच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे.
मागणीनुसार जारविक्रीचे दर ठरत आहे. या व्यवसायासाठी प्रशासनाकडे नियमावलीच नसल्याने जारचे पाणी शुद्ध आहे की नाही, हे तपासायचे कोणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.आरओचे पाणी महागणार शहरात ॲक्वाफिना, रॉयल, ॲक्वा, सहारा, बिसलरी आदी कंपन्यांचे पाणी विकले जाते. सोबतच स्थानिक कंपन्यांनीचेही पाणीचे जार घरोघरी पोहोचविले जातात. सध्या जारचे दर ३० रुपयांपर्यंत स्थिर असले तरी ॲक्वा व आरो फिल्टर पाण्याचे दर उन्हाळ्यामुळे वाढले आहेत. मे व जूनमध्ये आरओचे पाणी अजून महागणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. सध्या जार उत्पादकांकडून पारदर्शक सीलबंद जारद्वारे दर्जाहीन पाणी ग्राहकांच्या माथी मारले जात आहे.पाण्यातून पैसा कमावण्याच्या गाेरखधंद्या सध्या जोमात सुरू आहे.अनेक वर्षापासून हा जार व्यवसाय सुरु आहे.परंतु एकदाही अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई झालेली नाही त्यामूळे नेमके पाणी मुरते कुठं असा प्रश्न जनतेला पडला आहे.
चौकट-उत्पादन करणाऱ्यांवरही नियमांचे लादले ओझे...
बाटली बंद पाण्याचे जारचे उत्पादन करणाऱ्यांवरही अनेक नियमांचे ओझे लादण्यात ओले आहेत. बीआयएसने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे पाण्याचे प्रत्येक चार तासांनी, दरराेज, आठवड्याला महिन्याला तपासणीचा अहवाल ठेवणे अनिवार्य आहे. तसेच, बाहेरील लॅबमधून तपासणी करणेही आवश्यक आहे. याउलट बाेगस धंदा करणारे अधिकाऱ्यांचे खिसे गरम करीत असल्याने त्यांना यापैकी काेणतेच नियम निकष पाळण्याची आवश्यकता भासत नाही.
चौकट-कारवाई व्हायला हवी...
पाणी विकत घेताना ग्राहक फक्त शुद्ध पाणी दिसते म्हणून बाटली विकत घेताे. ते पाणी कुठे तयार केले काेणत्या कंपनीचे अाहे, याबाबत त्याला अजिबात जिज्ञासा नसते. म्हणूनच बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्यांचे फावते. संबंधित यंत्रणेने छापासत्र राबवून अशा प्रकारचे गाेरखधंदे बंद केले पाहिजेत.
धनराज पा,भुमरे,सामाजिक कार्यकर्ते,पाचोड
चौकट-नियम काय सांगतो..?
आयएसआय मानांकन असलेल्या उत्पादकांच्या उत्पादनाची सहा महिन्यांतून एकदा बाजारातून नमुना विकत घेऊन लॅबमध्ये तपासणी आवश्यक आहे. तसेच, उत्पादन करणाऱ्या जागेवर जाऊन पाहणीही गरजेची आहे. मात्र, राज्यात पुणे, मुंबई नागपूर या तीनच ठिकाणी आयएसआयची कार्यालये असून, त्यांच्या अधिकाऱ्यांकडूनही संबंधित जिल्ह्यातील समन्वयकांकडूनच तपासणीची औपचारिकता पूर्ण केली जाते.
चौकट-पाण्यातून पैसे कमावण्याच्या गाेरखधंद्यावर प्रशासनाची कृपादृष्टी; नागरिकांच्या अनाराेग्यालाआमंत्रण गल्लाेगल्ली तयार हाेतात बाटलीबंद जार, पाणी बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यासाठी ब्युराे आँफ इंडियन स्टँडर्ड अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी आवश्यक असतानाही अन्न औषध प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साेयीने हाेत असलेल्या दुर्लक्षामुळे गल्लाेगल्ली बाटलीबंद पाणी वा जार तयार करून त्याची विविध मार्केटमध्ये जास्त दरने विक्री केली जात आहे.