मंगलदास बांदल यांची रणनीती राष्ट्रवादीला डोके दुखी ठरणार

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

( शिक्रापूर प्रतिनिधी ) पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल काही काळ कारागृहात असल्याने राजकारण शांत झालेले होते त्यांनतर आज त्यांनी नुकतीच त्यांची भूमिका जाहीर करत यापुढील सर्व निवडणुका लढवण्याचे संकेत दिले असल्याने मंगलदास बांदल यांची रणनीती राष्ट्रवादीला डोके दुखी ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  

                              पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांचा राजकीय कार्यकाल अनेकांना डोकेदुखी ठरणारा आहे, बांदल यांनी शिक्रापूर सारख्या गावातून प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवून सत्तांतर करत सरपंचपद खेचून घेतले, त्यांनतर दोन वेळा बाजार समितीची निवडणूक लढवून एकदा बहुमत नसताना देखील राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडून बांदल बाजार समितीचे सभापती झाले, तर जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने केंदूर पाबळ गटातून अपक्ष उमेदवारी लढवत जिंकली देखील, दरम्यान विधान सभा निवडणुकी दरम्यान भाजपचे तत्कालीन आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने भाजपकडे उमेदवार नसल्याने भाजपच्या नेत्यांनी बांदल यांना उमेदवारी देऊ केली मात्र त्यावेळी बाबुराव पाचर्णे अपक्ष लढल्याने बांदल यांना थोड्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र त्यांनंतर पुन्हा बांदल यांना राष्ट्रवादीने शिक्रापूर तळेगाव गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्याने बांदल यांनी तेथे विजय मिळवत पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती पद खेचून आणले, त्यांनतर पुन्हा महिला आरक्षण आल्याने त्यांनी पत्नीसाठी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पत्नीला उभे करत अपक्ष जिल्हा परिषद उमेदवारी लढवली मात्र यावेळी त्यांनी सदर गटामध्ये दोन पंचायत समिती उमेदवार उभे केले व ते उमेदवार पराभूत झाल्यास पत्नीचा राजीनामा देईल अशी ठोस भूमिका घेत तीनही उमेदवार निवडणून आणले, दरम्यान त्यांनी लोकसभेसाठी तयारी करत खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव करणारच अशी भूमिका घेत रान पेटवले मात्र यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बांदल यांना काही शब्द देत त्यांना राष्ट्रवादी मध्ये घेत प्रदेश उपाध्यक्ष पद देऊ केले, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाची भूमिका बजावत आढळराव पाटील यांचा पराभव करत डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करुन दाखवले, त्यामुळे बांदल कधी काय भूमिका घेतील आणि काय करतील याचा अंदाज मुरब्बी राजकारण्यांना येऊ शकत नाही, परंतु आढळरावांच्या पराभवानंतर देखील आढळराव व बांदल यांची मैत्री कायम राहिली, नुकतेच बांदल कारागृहातून बाहेर आले आणि मैदानात उतरले असताना त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली असून यावेळी बोलताना आपण कारागृहातून बाहेर पडताच प्रथम माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा प्रथम फोन आला आणि त्यांनी आपल्या तब्बेतीबाबत विचारपूस केली असे सांगत त्यांचा आपण पराभव करुन दाखवून देखील ते आपल्यावर नाराज नसल्याचे सुद्धा सांगितले, तर सर्व निवडणुका मोठ्या ताकतीने लढण्याचे संकेत देत वेळप्रसंगी शिरुर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात आपला उमेदवार उभा करण्याचे देखील जाहीर केले असल्यामुळे मंगलदास बांदल यांची रणनीती राष्ट्रवादीला डोके दुखी ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.