गावतांडा येथे अफूची शेती करणाऱ्यां एक जणांवर कारवाई
"२ लाख १४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त"
पाचोड(विजय चिडे)
पैठण तालुक्यातील गावतांडा येथील एका शेतकऱ्याने शेतात अवैधरित्या लागवड केलेल्या अफूच्या शेतीवर पाचोड पोलीसांसह पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांने धाड टाकुन २ लाख १४ हजार रूपयांची झाडे जप्त केल्याची घटना गुरुवार दि.२३रोजी सकाळी घडली. या प्रकरणी एका शेतकऱ्यावर पाचोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,गावतांडा ता.पैठण येथील शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना व्यापारी व व्यावसायिक हेतूने शेतकरी रामभाऊ सूर्यभान गोरडे यांनी भाजी पाल्याच्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अमली पदार्थाच्या झाडांची लागवड केली होती. अफूच्या ओल्या झाडांचे व बोंडांचे एकूण वजन १५ किलो तसेच अफूच्या बोंडा सह झाडांची एकूण किंमत अंदाजे २ लाख १४हजार रुपयांची रोपे जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल पाटील नेहूल, पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोस माने,उपनिरिक्षक सुरेश माळी, गोपनीय शाखेचे अभिजीत सोनवणे, डीवाएसपी पथकाचे सुनील कानडे मेजर, अमोल सोनवणे यांनी अवैधरित्या करण्यात येत असलेल्या गावतांडा येथील अफूची शेतीवर छापा मारून सव्वा दोन लाख रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने हे पुढील तपास करत आहेत.