तरुण शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या 

"पैठण तालुक्यातिल वडजी येथील धक्कादायक घटना"

पाचोड (विजय चिडे)

वाढते कर्ज आणि नापिकीला कंटाळून वडजी ता.पैठण येथील एका तरुण शेतकऱ्यांनी विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.२०) रोजी सकाळी सहाच्या दरम्यान उघडकीस आले असून अक्षय दिलीप गोजरे (वय२६)असे आत्महत्या केलेल्या तरूणांचे नाव आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की, पैठण तालुक्यातिल वडजी येथील अक्षय गोजरे यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. उत्पादन वाढवून कर्ज फेडावे असे त्यांनी नियोजन केले होते. पण निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठत शेतीमालाचे कवडीमोल दर यामुळे कर्ज फेडण्याचे तर लांबच पण कर्जाचा डोंगर वाढतच गेला. घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होता.सध्या शेतकरी काळाच्या ओघात शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक ना अनेक प्रयोग केले जातात पण निसर्गाचा लहरीपणा बेभरवश्याचे शेतीमालाचे दर यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. अशीच प्रतिकूल परस्थिती निर्माण झाल्याने वडजी येथील तरुण शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे.अक्षय गोजरे हा रविवारी रात्री जेवण करुन शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता.मात्र तो सोमवारी सकाळी घरी आला नाही. त्यामुळे त्याचे वडील दिलीप गोजरे हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना अक्षय याने विषारी औषध प्राशसन केल्याचे लक्षात आले असता त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ 

नातेवाईकांसह गावातील पोलिस पाटिल,सरपंच यांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनी ताबडतोब पाचोड पोलिस ठाण्यात कळविले असता सहाय्यक फौजदार सुधाकर मोहीते,पोलिस नाईक प्रशांत नांदवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून अक्षय यास गावकऱ्यांच्या मदतीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डाँ.शिवाजी पवार यांनी अक्षय गोजरे यास तपासुन मृत घोषित केले त्यावर उत्तणीय तपासणी केली आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पूढील  तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करित आहेत.