महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 9 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जऊळका येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या ,पुस्तके, पेन यांचे वितरण करण्यात आले.

     बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज 9 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक आदर्श पायंडा पाडला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वया पुस्तके वाटप करीत असताना राजेश कव्हर, भरत पोदाडे, राजु देशमाने ,कैलास गजबे, शेख अजीस,गोपाल धोंगडे, नारायण धोंगडे, सुरेश सरोदे यांचे सह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.