शाळा व कॉलेजमधील तरुण पिढी व्यसनांचे अधीन जाऊ नये याकरिता शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या आतील आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्या पान, बिडी व तंबाखू विक्रीचे दुकाने यांचेवर सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम (कोटपा कायदा) २००३ अन्वये कारवाई करण्यात येते.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

      त्या पार्श्वभूमीवर जानेवारी २०२३ मध्ये दि.१९.०१.२०२३ ते दि.२५.०१.२०२३ दरम्यान विशेष कारवाई मोहीम राबवून सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (कोटपा कायदा) २००३ अन्वये एकूण ४८५ कारवाया करत ९७,०००/- रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये वाशिम जिल्ह्यात वर्षभरात ११८९ कारवायांमध्ये एकूण २.५६ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे आरोग्यास हानिकारक असून त्यामुळे दुर्धर व गंभीर आजार उद्भवू शकतात. भविष्यातदेखील विशेष मोहिमा राबवत कोटपा कायद्याअन्वये कारवाया सुरुच राहणार आहेत.

      सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेची पथके तयार करून करण्यात येत आहेत.