वढू बुद्रुक ता. शिरुर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाचा विकास होत असताना सदर विकास आराखड्याबाबत स्मृती समिती व ग्रामस्थांना विचार घेतले जात नसून यामध्ये ग्रामस्थांना व स्मृती समितीला विचारात घ्यावे अशी मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ येथे गेली सव्वीस वर्षांपासून समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार साठी सेवा करत आहेत, मात्र सध्या समाधी स्थळाचा विकास होत असताना येथे होणाऱ्या विकास आराखड्याबाबत समितीला विचारात घेतले नाही त्यामुळे सदर ठिकाणी विकास आराखडा तयार करताना समितीला विचारात घ्यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,
याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, नंदकुमार एकबोटे, शांताराम भंडारे, अनिल भंडारे, संजय भंडारे, हरिभाऊ भंडारे, सचिन भंडारे, लक्ष्मण भंडारे यांसह आदी उपस्थित होते,
तर यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक हे विशेषण न वापरता "धर्मवीर" हेच विशेषण वापरावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे