जुने वर्गमित्र अठरा वर्षांनी भेटले; ​​​​​​​पाचोडच्या जवाहर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा

पाचोड(विजय चिडे)

महाविद्यालयाच्या सवंगडी, वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा असो या महाविद्यालय सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच येथील जवाहर कनिष्ठ महाविद्यालयाच्या २००३-४च्या बॅचचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलना च्या निमित्ताने १८ वर्षांनी (दि.२८)रोजी शनिवारी जुनेमित्रांनी पुन्हा एकत्र आले असुन भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

जवाहर कनिष्ठ विद्यालयातील मराठी माध्यमाच्या या बॅचचे माजी विद्यार्थी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आले. त्यांनी 'जवाहर कनिष्ठ मा.वि२००४'या नावाने व्हॉट्सअँप समुह सुरू केला या काही काळातच ग्रूपवर सदस्य वाढत गेले असुन यात एकूण ६० वर्गमित्र आहे. या समुहामुळे माजी विद्यार्थ्यांच्या भेटी होऊ लागल्या. गप्पांचे फड रंगू लागले. त्यातूनच सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करू रीयुनियन म्हणजेच या बॅचचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याची योजना पुढे आली.

२८ जानेवारी महाविद्यालयात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि पुन्हा सर्व जण महाविद्यालयाच्या वर्गात रमून गेले. यावेळी २००३-४चे शिक्षक प्रा.बाळासाहेब आव्हाड, प्रा,रामदास कोहक,प्रा.विठ्ठल वाघ,प्रा.शिवाजी नजन,प्रा.नईम सय्यद, प्रा.राजकुमार भुमरे यांचा सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात आले तर आपल्या सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र किरण धारकर,राहुल धारकर,सतीश घुले हे आज या जगात नसल्यामुळे त्यांना सर्व वर्गमित्रांकडून भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण सातपुते यांनी केले तर आभार परदर्शन विष्णु निबांळकर यांनी मानले,या कार्यक्रमाची प्रस्तावना किशोर ढिलपे यांनी केले असून या कार्यक्रमाचे नियोजक ज्ञानेश्वर हजारे,भारत काळे,राजू शिंदे,सचिन थोटे,पंकज जैन,अमोल शिंदे,विष्णू शिंदे यांनी केलै होते,यावेळी प्रतिभा मुंडे,शिवाजी राऊत,कृष्णा तांबे,रामेश्वर साटतोटे,अनिल जाधव,गणेश करंगळ,जितेंद्र जैस्वाल,शहानवाज शेख,अभिजित तवार,कैलास खरग,अर्जुन राऊत,रवि मगरे,सिद्धार्थ वाहळ,मिलिंद शेळके,नामदेवृ,खवाटे,नंदू जाधव,प्रभाकर ढाकणे,सचिन ढवणे,बाळासाहेब वाघ,अंकुश सोनवणेसह आदी वर्गमित्र मोठ्या संख्याने उपस्थिती होते.