पहिल्या बालसाहित्य संम्मेलनाध्यक्षपदी प्रकाश घादगिने
औसा-लातूूर ही एक साहित्यीक व सांस्कृतीक परंपरा लाभलेली नगरी असुन इथे अनेक नामवंत लेखक,कवी,कांदबरीकार व विचारवंंतानी आपले अमुल्य असे योगदान दिलेले आहे. त्यात देविसिंह चौहान,डॉ.जनार्धन वाघमारे,डॉॅ.सुर्यनारायण रणसुभे,रा.रं.बोराडे,
डॉ.शेषेराव मोहिते,अतुल देऊळगावकर,नागोराव कुंभार,रमेश चिल्ले,श्रीराम गुंंदेकर,राजा होळकुुंदे,विनय अपसिंगेकर,भारत सातपुतेे,योगिराज माने,सुरेंद्र पाटील अशा नामंंवत विचारवंत,लेखक,कवीनी ही परंपरा पुढेे चालुु ठेवली आहे.
बालसाहित्यातही आपला वेगळा ठसा उमटवणारे लेखन इथली साहित्यीक मंडळी करीत असतात. त्यात प्रकाश घादगिनें यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल.अ.भा.मराठी साहित्य संस्था शाखा लातूूरची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झालीला असुन ज्येष्ठ साहित्यीक रमेश चिल्ले यांनी अध्यक्ष म्हणुन जबाबदारी स्वीकारली आहे.त्यानिम्मीताने उदघाटन व पहिले बालसाहित्य संंमेलनाचेे आयोजन करण्यात आले आहे.या पहिल्या संमेलनास अध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ बाल साहित्यीक व व्यंगचित्रकार प्रकाश घादगिने यांची निवड करण्यात आली आहे.
प्रकाश नगरातील बालविकास शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरस्वती विदयालयात दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पूूण्याच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष मा.राजने लाखे यांच्या हस्ते सम्मेलनांचे उदघाटन होणार आहे.त्यावेळी प्रमुुख पाहुणे म्हणुन डॉ.दिलीप गरूड,विलास रासकर व भरत सुरसे संस्थेचे सचिव अॅड.लक्ष्मणराव भागवत हेे राहणार आहेत.तर प्रमुख उपस्थिीती विजय जगताप,प्रशांत गौतम व मुख्याध्यापक कालीदास शेळके यांची असणार आहे.
या प्रसंगी नुकताच राज्यशासनाचा साने गुरूजी बालकथा पुरस्कार मिळालेल्या लेखिका वृषाली पाटील व स्वाराती विदयापीठ नांदेड च्या अधिसभा सदस्यपदी निवड झालेल्या उमा व्यास यांचा सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी कथाकथन डॉ.दिलीप गरूड यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन त्यात जी.जी.कांबळे ज्येष्ठ कथाकार व शैलजा कांरडे भाग घेतील तर कविसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी भारत सातपुते असुन त्यात सर्वश्री रमेश चिल्ले,नागनाथ कलवले,कल्याण राऊत,वृषाली पाटील,उषा भोसले,सविता धर्माधिकारी,विमल मुदाळे,दतप्रसाद झंवर,छगन घोडके,गोविंद गारकर,रमेश हणमंते,क्रांती मोरे,विजया भणगेे,सुनिता मोरे,प्रभा वाडकर,महेंद्र गायकवाड,सुलक्षणा सोनवणे,सीमा हिप्परगेकर,नंदिनी पूजारी,उमा व्यास, निलीमा देशमुख यांचा सहभाग असुन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नयन राजमाने व सुनिता देशमुख तर आभार प्रदर्शन राजकुमार दाभाडे मानणार आहेत असे अध्यक्ष रमेश चिल्ले व सचिव नागनाथ कलवले यांनी कळवले आहे. शहरातील बालसाहित्यावर प्रेम करणार्याा विदयार्थी व साहित्यांकानी उपस्थित राहवे ही विनंती