मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर

( शिक्रापूर प्रतिनिधी ) पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना शिक्रापूर पोलिसांनी २६ मे २०२१ रोजी अटक केलेली होती, त्यांनतर त्यांच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढत गेल्याने त्यांची कोठडी अनेक दिवस वाढत गेलेली असताना अखेर एक वर्ष आठ महिन्यांनी न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याने मंगलदास बांदल गटात आनंदाचे वारे वाहू लागले आहे.

                                     पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल यांच्या सह त्यांच्या काही साथीदारांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल होताच शिक्रापूर पोलिसांनी अतिशय गोपनीयता बाळगत मंगलदास बांदल यांना अटक केली होती, त्यांनतर त्यांच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या कोठडीत वारंवार वाढ होत गेली, त्यांनतर काही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर होत काही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर होणे बाकी असल्याने त्यांना दिलासा मिळत नव्हता त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत होत्या, अखेर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असल्याने अखेर एक वर्ष आठ महिन्यांनी मंजूर केला असल्याने शिक्रापूर सह पुणे जिल्ह्यात मंगलदास बांदल समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.