मंगरूळपीर येथे के.डी चांडे इंग्लिश स्कूल दि.- 27 डिसेंबर(मंगळवार)रोजी  झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा तुळजापूर,मंगरूळपीर येथील दोन विद्यार्थी व एक माध्यमिक शिक्षिका यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी साठी निवड झालेली असून यामध्ये, पवन दिनेश लोखंडे वर्ग ९ वा या विद्यार्थ्यांची निवड ब गटामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होऊन त्याचे (पायथागोरस थेरम) ह्या गणितीय मॉडेलची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे.चैतन्य कोकर्डे वर्ग ८ वा या विद्यार्थ्यांची निवड अपूर्व विज्ञान मेळावा(मॅथेमॅटिकल क्लॉक) या मॉडेलची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे. वरील यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतीला मार्गदर्शक शिक्षक म्हणून निवासी शाळेतील तासिका तत्त्वावरील माध्यमिक शिक्षिका कु.पूजा कांबळे यांनी भूमिका पार पाडली.तसेच,निवासी शाळेतील तासिका तत्त्वावरील शिक्षिका कु.पूजा कांबळे यांची गणितीय प्रतिकृतीची निवड प्रथम क्रमांकाने माध्यमिक शिक्षक गटातून जिल्हास्तरासाठी झालेली आहे.*सर्व स्पर्धांना पंचायत समिती मंगरूळपीर येथील गटशिक्षणाधिकारी श्री.गजानन डाबेराव साहेब यांच्याकडून प्रशस्ती पत्राचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या व शिक्षकाच्या यशाबद्दल सामाजिक न्याय विभाग वाशिमचे सहाय्यक आयुक्त श्री.मारुती वाठ यांनी कौतुक केले तसेच निवासी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुमेध चक्रनारायण व शाळेतील इतर सर्व कर्मचारी स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे व सहभागी शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले.