कवठे येमाई ता. शिरुर येथील भीमाबाई सांडभोर या गावातील आरोही ढाब्यासमोर उभ्या असताना दोन युवक दुचाकीहून आले त्यांनी भीमाबाई यांना आम्ही पोलीस आहोत, दोन दिवसांपूर्वी एका बाईला चाकू लावून लुटले आहे, तुमचे दागिने काढून कागदावर ठेवून पिशवीत ठेवा असे सांगत दागिने काढायला लावून कागदात ठेवून पिशवीत ठेवा असे सांगितले, काही वेळात भीमाबाई यांनी पिशवीतील कागद पाहिला असता त्यामध्ये दागिने नव्हते तर दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करुन दागिने लांबवल्याचे लक्षात आल्याने भीमाबाई सुखदेव सांडभोर वय ६५ वर्षे रा. कवठे येमाई ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात दोघा इसमांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल आगलावे हे करत आहे.