औरंगाबाद :- (दीपक परेराव )दि. २३/१२/२०२२ मे २९/१२/२०१३ मालेगाव, जि.नाशिक येथे अंतरराष्ट्रीय भागवत भूषण परम पूज्य पंडित श्री. प्रदीपजी मिश्रा (सिहोरल वाले) याचे शिवपुराण कथेचे आयोजन केले आहे.

 तेथे मोठ्या प्रमाणात भाविकांची इच्छा असून मालेगाव ला जाण्याऱ्या बसेसची संख्या कमी असल्याने राज्य परिवहन मंडळ विभागीय नियंत्रक .. विभागीय कार्यालय औरंगाबाद यांना नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीने निवेदन देऊन जास्तीत जास्त बस गाड्या मालेगाव नाशिक साठी भाविकांसाठी सोडण्यात याव्या करीता मागणी केली आहे. या प्रसंगी निवेदन देताना नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी चाणक्य यांच्या मार्गदशनाखाली ,मराठवाडा प्रांत अध्यक्ष बाबासाहेब दाणे, मराठवाडा संघटन महामंत्री अरुण गणपुरे आदीची उपस्थिती होती.