शिरुर तालुक्यात सैनिक पत्नीची जमीन खरेदी फसवणूक

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते खरेदीखत

( शिक्रापूर प्रतिनिधी ) तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे एका सैनिकाच्या पत्नीला खरेदीखत करुन देत विक्री केलेल्या शेतजमिनीची महिलेच्या परस्पर अन्य व्यक्तीला विक्री करुन फसवणूक करत महिला सदर शेतात गेली असता महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सदाशिव देवराम शिंगाडे, सीताबाई लालू शिंदे, राधाबाई रामचंद्र कोळपे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                                   वरुडे ता. शिरुर येथील सेवानिवृत्त सैनिकाची पत्नी असलेल्या सारिका शिंगाडे यांनी गावातील सदाशिव शिंगाडे, सिताबाई शिंदे, राधाबाई कोळपे यांच्याकडून जमीन विकत घेतली होती त्या जमिनीचा मोबदला देखील त्यांना देऊ करत त्याबाबतचे खरेदीखत सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे केलेले होते, मात्र त्यांच्या जमिनी गटामध्ये हिस्सा असलेले दगडू माने हे मयत असल्याने त्यांच्या वारसांची ननोंद झालेली नसल्याने सदर जमिनीतील माने यांच्या हिस्स्याचे खरेदीखत झालेले नव्हते, मात्र सारिका शिंगाडे यांनी चावडी ॲपवर त्यांच्या जमिनीच्या नोंदणीची पाहणी केली असता सारिका शिंगाडे यांनी खरेदी केलेली जमीन सदाशिव शिंगाडे व अन्य दोघांनी पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला शिरुर दुय्यम निबंधक कार्यालय येथे विक्री केल्याचे दिसून आल्याने सारिका शिंगाडे यांनी शिरुर येथे जात त्याबाबतचे कागदपत्र काढून घेतले, त्यांनतर सारिका या त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीत गेल्या असता सदाशिव शिंगाडे यांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत आधी नोंद लावून ए नाहीतर हातपाय तोडील अशी धमकी दिली, याबाबत सारिका सीताराम शिंगाडे वय ५२ वर्षे रा. शिंगाडवाडी वरुडे ता. शिरुर जि. पुणे सध्या रा. साई सत्यम पार्क वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सदाशिव देवराम शिंगाडे रा. शिंगाडवाडी वरुडे ता. शिरुर जि. पुणे, सीताबाई लालू शिंदे रा. शिंदेवाडी मलठण ता. शिरुर जि. पुणे, राधाबाई रामचंद्र कोळपे रा. हिंगणी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करत आहे.