भारतीय दलित खोबरा औरंगाबाद या सामाजिक संघटनेच्या वतीने व संघटनेला अनुसरणारे ३00 ते ४00 महिला व पुरुष नागरिकांच्या वतीने आज मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी स्थळ:- क्रांती चौक औरंगाबाद येथे प्रचंड निदर्शने आंदोलन घेवून निवेदन सादर करण्यात येते की, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे पैठण, औरंगाबाद येथे म्हणाले की,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा चालविल्या. चंपा यांनी जाणीवपूर्वक जातीय वादी मानसिकतेतून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान केला आहे. त्यामुळे सर्व दलितांच्या भावना दुःखावल्या आहे.

समस्त दलितांच्या अस्मिता, भावनांचा अनादर करून महापुरुषांच्या अवमान करणारे चंद्रकांत पाटील यांच्या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध.