संभाजीनगर : शिधा'च्या थैल्या पोहोचल्या होत्या . यावर असलेल्या ' पंतप्रधान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या फोटोंसह माझा फोटोही दिसायला हवा . ' असा आग्रह पालक मंत्री संदिपान भुमरे यांनी धरला . महसूल प्रशासन व रेशन दुकानदार हेसुद्धा कामाला लागले चेलाचपाट्यांनी धावपळ करुन सर्व गोदामांमध्ये ' फोटो चिपको मोहीम हाती घेतली . - पैठण तालुक्यात आनंदाचा शिधा'मधून पामतेलाची पिशवी दिली जात नसल्यामुळे गोरगरिबांच्या दिवाळीच्या ' आनंदा'वर विरजण पडले आहे . त्यातच गद्दार मंत्री संदिपान भुमरे यांनी स्वखर्चाने स्वतःचा फोटो किटवर चिकटविण्याच्या अट्टाहासापायी धान्य वाटपाला अगोदरच ४ दिवस विलंब झाला असून , ऐन सणाच्या दिवशी रांगेत उभे राहण्याची वेळ महिला - पुरुषांवर आली . परिणामी दर महिन्याला मिळणाच्या शिधेच्या ' आनंदा'लाही मुकावे लागले . पैठण तालुक्यात एकूण २०८ स्वस्त धान्य दुकानांपैकी अनेक दुकानांमध्ये ' आनंदाचा शिधा'च्या किटमधून तेलाची पुडी गायब आहे . एकूण ५८ हजार शिधापत्रिकाधारक आहेत . याबाबत अनेक गावांतील लोकांनी स्वस्त धान्य दुकानदारांना विचारणा केली असता आम्हालाच पामतेलाच्या पिशव्या मिळाल्या नाहीत . तुम्हाला कुठून द्याव्यात ? असा प्रतिप्रश्न केला जात आहे . पैठण शहरासह ग्रामीण भागातही ही परिस्थिती आहे . तालुक्यातील पैठण शहर , पाचोड व बिडकीन या तिन्ही गोदामांमध्ये १ ९ रोजीच ' आनंदाचा या सर्व हास्यास्पद प्रकारात दोन तीन दिवस निघून गेले . यात प्रधानमंत्री , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पेक्षाही मोठा फोटो लावण्याची हौस पूर्ण झाली . परंतु , लाभार्थ्यांच्या पदरात धान्य पडायला अक्षम्य विलंब झाला . दिवाळीच्या पूर्वसंध्येला व थेट आज दिवाळी सणाच्या दिवशी धान्य मिळाले . त्यातही अनेक दुकानांतून ' आनंदाचा शिधा ' मध्ये चनादाळ , रवा व साखर यांचेच वाटप झाले आहे . तेलाच्या पिशव्या मात्र मिळाल्या नाहीत . यासाठी बहुतांश दुकानांच्या समोर रांगा लावाव्या लागल्या हे विशेष ! दरम्यान दिवळसणाच्या सलग सुट्ट्या आल्यामुळे तहसील कार्यालयच बंद असल्याने लाभार्थ्यांनी जे आहे त्यात आनंद मानत दिवाळी साजरी केली