चला जाणूया नदीला’ अभियानामध्ये जिल्ह्यातील शिवना, दुधना आणि खाम नदीचा समावेश करण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत ‘नदी संवाद यात्रे’चे यशस्वी आयोजन करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियाजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रदुषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भुपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये तसेच जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता तसेच साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी ‘चला जाणूया नदिला’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वप्रथम नदीचे आरोग्य जाणून घेऊन नदीचे आजार काय आहेत हे माहिती करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सूक्ष्म कृती आराखडा बनवून तिन्ही नद्यांचे सर्वेक्षण करा. नदी संवाद यात्रेचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले.यावेळी खाम नदीच्या पुनरुजीवन अभियानाची ध्वनिचित्रफित देखील उपस्थितांना दाखविण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आप्पसाहेब शिंदे, अभियानाचे समन्वयक गोकुळ सुरासे तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.