रत्नागिरी : राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व संजीवन दिव्यांग विकास संस्था, जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पाली बस स्टँडच्या बाजूला गोकुळ लिंगायत यांचे मंगल कार्यालय येथे आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगारासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
या मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, जिल्हा परिषदेचे यादव साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांच्यासह राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करनार आहेत. जिल्हयातील दिव्यांग बांधवांनी जास्ती जास्त संख्येने आनंद मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संजीवन दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष राकेश कांबळे यांनी केले आहे.