नागपूर औरंगाबाद महामार्गावर अपघाताची मालिका संपता संपत नसून आज किन्हिराजा जवळ घटना घडली असून या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली.

प्राप्त माहीती नुसार मेहकर तालुक्यातिल आरेगांव (डोणगांव)येथिल रहिवासी गणेश भगवान फूके (45) व त्यांची बहिण संगिता नारायण कांबळे (४०) हे दोघे बहीन भाऊ मंगरूळपिर तालुक्यातिल पेडगांव येथे दिलेल्या संगिताच्या मुलीच्या घरी एम एच२८ एआर ७३०२ या क्रंमाकाच्या दूचाकीने गेले होते.पेडगांव वरुन नागपूर औरंगाबाद या महामार्गावरुन परत येत असतांना याच मार्गावरुन भरधाव वेगाने येत असलेल्या एम एच ३४ एबी ४६१३ या क्रंमाकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. ही धडक एवढी भंयकर होती की फूके यांची दूचाकी ट्रकच्या मधोमध अडकून काही अंतरापर्यंत फरफटत गेली.यामध्ये गणेश फूके यांच्या डोकाला मार लागल्याने त्यांचा जागिच मृत्यू झाला तर संगिता कांबळे यांच्या डोक्याला गंभिर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. एक गाय सुध्दा या अपघातात जागीच ठार झाली. ट्रक चालकाने चालु ट्रक जागेवर उभा करुन घटनास्थळावरुन पसार झाला. गंभिर जखमीला येथिल प्राथमिक आरोग्य केद्रांच्या रुग्णवाहीकेने वाशिम येथिल शासकिय रुग्नालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जउळका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर वानखेडे ,निरंजन वानखेडे, हेड कॉन्स्टेबल पावसे, पोलीस कॉन्स्टेबल रवी जवंजाळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.पुढिल तपास जऊळका पोलीस चे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.