गेवराई दि. ८ (प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे घोसापूरी, आहेर चिंचोली, एरंडगांव आणि पाटेगांव/मुगगांव या ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी बिनविरोध आलेल्या सरपंच आणि सदस्यांचे अभिनंद करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबुत होत असुन येणार्‍या ग्रामपांचयत निवडणुकीमध्ये इतर ग्रामपंचायतीही बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या ताब्यात येणार असल्याचा विश्वास विजयसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज माघे घेण्याच्या दिवशी गेवराई विधानसभा मतदार संघातील घोसापूरी, आहेर चिंचोली, एरंडगांव आणि पाटेगांव/मुगगांव या चार ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेस पाक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. घोसापूरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शेख फारुक उस्मान अली यांची तर सदस्य म्हणुन सुभाष जाधव, अजय माळी, कल्याण बांड, सुरेश वैद्य, शेख अय्याज, लक्ष्मण कदम, विकास वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. आहेर चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगिता विकास रकटे यांची तर सदस्य म्हणुन सारिका बहिर, रुपाली इनकर, प्रवेश इनकर, नागनाथ रकटे, राजेंद्र सावंत, विकास रकटे, सर्जेराव रुपनर, वैशाली गोरे आणि बबीता जाधव यांची बिनविरोध निवड झाली. एरंडगांव ग्रामपंचायत सरपंचपदी संतोष लाखे यांची तर सदस्य पदी दत्ता लाखे, अमोल लाखे, सुग्रीव लाखे, रामनाथ लाखे, बाळकृष्ण प्रधान यांची बिनविरोध निवड झाली. पाटेगांव/मुगगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भुमिका अरविंद दुबाले यांची तर सदस्य म्हणुन सुनिता कदम, सचिन कदम, बालासाहेब वाघ, गोरख आठवले, रमेश कदम, अर्चना वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बिनविरोध झालेल्या सरपंच आणि सदस्यांचे माजी अमादार अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या पुर्वीच गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये या चार ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पताका फडकली असल्यामुळे मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड मजबुत झाली आहे. उद्याच्या निवडणुकीतही उर्वरित ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास विजयसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.