बरेली: नवरीने नवऱ्याला एका खोलीत घेऊन चक्क ब्लॅकमेल केले आहे. तु स्वत:हून लग्नाला नकार दे नाहीतर मी पळून जाईन असे म्हटले आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. यानंतर तिथे जोरदार राडा झाला आहे.

नवरीने लग्नाच्या आधी होणाऱ्या पतीला एकटे बोलायचे आहे असे सांगितले. यामुळे तो तिच्याशी बोलण्यासाठी खोलीत गेला. तिथे त्याला धक्काच बसला. नाही तू दिसायला सुंदर आहेस, नाही चांगली शिकलेला. तुझा रंगही काळा आहे. यामुळे माझ्या मैत्रिणी माझी चेष्टा करतील. यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. यापेक्षा तुच लग्नाला नकार दिलास तर बरे होईल. मी पळून गेले तर तुझ्याच घरच्यांची बदनामी होईल असे तिने त्याला सांगितले. 

नवरदेवाला आत जाताना काहीतरी वेगळेच वाटले होते. परंतू आत गेल्यावर त्याची अवस्था बेकार झाली होती. त्याने लगेचच लग्नाला नकार दिला. परंतू हे कळताच झाले उलटेच. नवरीकडच्या पक्षाला याचा राग आला, ऐन वेळी लग्नाला नकार दिल्याने त्यांचा पारा चढला आणि वाद सुरु झाला. नवरीच्या घरच्यांनी नवऱ्याकडच्यांचे साहित्य हिसकावून घेतले आणि राडा करु लागले.

दिल्लीच्या निहाल विहारचा मुलगा होता. सहा महिन्यांपूर्वीच साखरपुडा आणि अन्य विधी करण्यात आले होते. वर दुर्गा प्रसादने सांगितले की, तिनेच मला हे सांगितले. यामुळे मी लग्न न करण्याचे ठरविले. परंतू, तिच्या बहिणीच्या नवऱ्याने फोनवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि खोट्या केसमध्ये तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. यामुळे वाद सोडविण्यासाठी आम्ही तिच्या घरी गेलो. परंतू तोडगा निघाला नाही. एका धर्मशाळेत नेत आमच्याकडे दोन लाख रुपये मागितले. 

नातेवाईकांच्या पंचायतीने देखील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतू या लोकांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला आणि मारहाण केली. यामुळे आम्ही कोर्टात मदत मागितली. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु झाली आहे.