दापोली - विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना अंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, दापोली येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी बियाणांच्या लागवडीपूर्वी घेण्याच्या उपाय योजनांचे प्रात्यक्षिक दिले. राष्ट्रीय कृषी शिक्षा दिनाचे औचित्य साधुन होडावडे, वेंगुर्ला येथील 'कृषी मित्र' गटाने बियाणे वापरताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, रोग होण्यापूर्वीच बियाणाला उपाय दिले पाहिजेत याची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्याचसोबत सध्या रब्बी हंगामातील पिकाची कामे चालू असल्याने तेथील मिरची पिकाच्या बियाणांना कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार थायरम बुरशीनाशक लावून रोपांसाठी पेरणी करण्यात आली. 

यावेळी शेतकरी महेश परब, सदानंद भगत, कृषी मित्र गटातील विद्यार्थी सतिश वाघमारे, सिध्दांत ओव्हाळ, विशाल सरुळे, उस्मान डबीर, कार्तिकेश भुवड, जोशीराम जाटोथ, वामशी कृष्णा कोड्रा, कृष्णा रेड्डी पलेर्ला, जगजीवन पोलाकटला, इ. उपस्थित होते. हे सर्व प्रात्यक्षिक वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद जोशी, रोगशास्र विषय विशेषज्ञ डॉ. राजेश राठोड, कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे सहसंचालक डॉ. व्ही. जी. नाईक तसेच फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला विभागाचे ए. ई. एस. डॉ. एम. सणस यांनी मार्गदर्शन केले.