लांजा शहरातील रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबरोबरच उड्डाणपूल तसेच नगर पंचायतीच्या पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पुढील ८ दिवसात कामाला सुरुवात करा, अशा सूचना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गेली अनेक वर्ष रखडलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असताना लांजा शहरात मात्र हे काम पूर्णपणे रखडलेले स्थितीत आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका हा शहरातील व्यापारीवर्गाला बसत असून यामुळे लांजा तालुका व्यापारी संघटनेने आक्रमक भूमिका घेत २९ नोव्हेंबर पर्यंत या बाबत मार्ग काढा अन्यथा नगर पंचायतीच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली २९ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार राजन साळवी, लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे, नगरसेवक राजेश हळदणकर, स्वरूप गुरव, लहू कांबळे नगरसेविका वंदना काटगाळर, सोनाली गुरव, दूर्वा भाईशेट्ये, मधुरा बापेरकर, प्रांताधिकारी वैशाली माने, लांजा तहसीलदार प्रमोद कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजाचे उपअभियंता प्रमोद भारती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रत्नागिरीचे सहाय्यक अभियंता प्रवीण कुमार जैसवाल, महावितरण शाखा अभियंता मनाली माळी, हॅन कंपनीचे पटेल, सुरेंद्र आपटे, अमर दिवेकर तसेच नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अविराज पाटील यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते. ८ दिवसात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली पाहिजे, अशी सूचनाही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.