ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीच्या मोहास बळी पडू नये --धाराजी भुसारे
जिंतूर प्रतिनिधी
दि २८ शहरातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन रविवार रोजी २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होती. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव धाराजी भुसारी यांनी मार्गदर्शन करताना ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीच्या मोहास बळी पडू नये असे आवाहन केले .
जिंतूर येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतची शाखा परभणी जिल्ह्यामधील उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांनी जिंतूर शाखेचे अभिनंदन केले. अनेक ग्राहकांची झालेली फसवणूक जिंतूर शाखेने योग्य मार्गदर्शन करून सोडवणूक केली आहे. तसेच नागरिकांनी बाजारपेठेमध्ये आलेल्या ऑनलाईन खरेदीच्या मोहात पडल्यामुळे अनेकांची फसवणूक झाली आहे. अनेकांना इन्शुरन्सची पॉलिसी घ्या म्हणून लिंक पाठवली जाते. तसेच तुमचे कर्ज मंजूर झाले म्हणूनही मोबाईलवर लिंक पाठविली जात आहे .अनेकांना तुमच्या कर्जाची फाईल मंजूर झाली आहे. कागदपत्रे अपलोड करा अशाही लिंक येत असल्याने नागरिकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच विज्ञान युगामध्ये अनेकांनी आमिषा देऊन,व फसव्या जाहिराती करून ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तू देण्याचे आम्हीष दाखवीत आहेत .यामुळे ग्राहकांची अक्षरशा फसवणूक होत आहे. तरी ग्राहकांनी सावध राहावे असेही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष धाराजी भुसारे होते.प्रमुख पाहुणे भानुदास शिंदे, एकनाथ मोरे, श्रीधर टेकाळे बाळासाहेब पवार इत्यादींची उपस्थिती होती. जिंतूर तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष गुलाबराव शिंदे, सचिव मंचक देशमुख, शहर अध्यक्ष दिलीप देवकर महिला शहराध्यक्ष आशाताई खिल्लारे, महेश देशमुख ,सतोष रोकडे,विष्णु चव्हाण, नारायण जगताप आदींची उपस्थिती होती.सुञसचलन मंचक देशमुख यांनी केले.आभार दिलीप देवकर यांनी केले.