शिक्षक मुलांना घडवण्याचे मोलाचे कार्य करत असतात शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडत असतात मात्र शासनाने शिक्षकांना मुलांना शिकवण्या शिवाय अन्य कामे देऊ नये असे प्रतिपादन माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे.
बकोरी ता. हवेली येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने माहिती सेवा समितीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, यावेळी बोलताना माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू वारघडे, माजी राजेश वारघडे, ज्ञानेश्वर वारघडे, मुख्याध्यापक सुनील गायकवाड, कृष्णा गवळी यांसह आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते,
यावेळी बोलताना शाळेचा परीसर स्वच्छ व बोलका असून परिसरात झाडे, पाणी शुध्द पाणी, स्वच्छ किचन यांसह प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर असल्याचे शाळा पाहण्यासारखी असल्याचे मुख्याध्यापक सुनील गायकवाड यांनी सांगितले तर शाळेच्या विकासासाठी व मुलांना खेळण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू वारघडे यांनी केली दरम्यान सर्वं शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने माहिती सेवा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आले