रत्नागिरी,( वा.) मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि कॉमर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या स्नेहा पालये यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून तसेच संविधानाचे प्रास्ताविक वाचून करण्यात आले.

 संविधान दिन साजरा का केला जातो? संविधानाबद्दल अधिक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी त्यांच्या ज्ञानामध्ये भर व्हावी या उद्देशाने कॉमर्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत संविधान दिन या विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनुक्रमे पाच गट सहभागी झाले, त्यामध्ये पहिला गट 'अ' प्राची निवळकर, आनंद नेवरेकर T.Y.B.Com, 'ब' गट कपिल कदम, अभिजीत गोताड TYBA 'क' गटात साहिल वीर' दक्षता खापरे SYBCom, 'ड' गटात आर्यन शिरधनकर, आश्विनी मांडवकर FYBCom 'इ' या गटात दिवेश यादव, चांदणी चौगुले FYBA असे होते यामध्ये प्रश्नांची अचूक उत्कृष्ट पद्धतीने उत्तर देऊन प्राची निवळकर आणि आनंद नेवरेकर यांनी विजेतेपद मिळवले.

 या कार्यक्रमाचे परीक्षण संस्कृती पाचकुडे, सूत्रसंचालन तेजश्री रेवाळे, मार्गदर्शन अवनी नागले यांनी केले. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य स्नेहा पालये उपप्राचार्य गणेश कुळकर्णी प्रा. कविता जाधव, प्रा. शामल करंडे, प्रा. गुरुनाथ सुर्वे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.