पाटोदा (प्रतिनिधी) 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने संविधानाचा स्वीकार केला व 26 जानेवारी 1950 पासून आपला देश खऱ्या अर्थाने लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य म्हणून अस्तित्वात आला. त्यामुळे आपण भारतीय खऱ्या अर्थाने या देशाचे शासक, सत्तधीश झालो. कारण या आधी आपल्या देशाने कारभार पहिला तो म्हणजे राजे महाराजे संस्थानिक किंवा परकीय आक्रमणकर्त्यांचा! म्हणून 26 नोव्हेंबर ला भारतात सामानतेच्या आधारावर कायद्याचे राज्य खऱ्या अर्थाने स्थापित झाले असे म्हणता येईल.देशामध्ये सर्व लोक मिळून मिसळून एकत्रित राहतात. पण समाजातील सर्वांचे विचार सारखेच असतील असे नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या राहणीमाणात, संस्कृतीमध्ये, खानपान, भाषा इत्यादी मधेही भिन्नता दिसून येते. पण असे असूनही सर्वांना एकाच धाग्यात गुंफण्याची भूमिका संविधान पार पाडते यामुळे पाटोदा तालुक्यात संविधान दिना निमित्त उद्देशिका वाचन,व्याख्यान,यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सर्व शासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालय,विविध पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे शनिवार दिनांक 26/ 11/ 2022 रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधान उद्देशिका वाचुण शपथ घेण्यात आली यावेळी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते,डॉक्टर,वकील,व्यापारी,पञकार यांच्यासह शेकडो भिमसैनिक उपस्थित होते