शिरुर: सविंदणे (ता. शिरुर) येथील विकास किठे, गोविंद किठे या दोन तरुण बंधुनी वेल्डिंग व्यवसायात स्वयंरोजगाराचे धडे गिरवत नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वताचा अर्थपुर्ण हिशोब करत ते चांगला रोजगार मिळवत आहेत. या व्यवसायात नेत्रदिपक भरारी घेत शेती उपयोगी औजारे बनवून या व्यवसायात त्यांनी मोठा हातखंडा निर्माण केला आहे. या मध्ये ट्रक्टरची ट्रॉली, नांगर, फनणी, पिकअप बॉडी, पेरणी यंत्र अशी विविध औजार यंत्रे ते किफायतशीर दरात बनवून विकत असल्याने नोकरीच्या पाठीमागे न लागता चांगला स्वंयरोजगार निर्माण केला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. या कामी त्यांना त्यांचे वडील प्रकाश किठे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
सविंदणे, कवठे येमाई, मलठण, टाकळी हाजी सहशिरुर तालुक्यातील पाश्चिम भागात व आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी,लाखणगाव या भागातून शेतकरी शेतीपयोगी वस्तू बनवून घेण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी करत आहे.
शिरुर -नारायणगाव अष्टविनायक रस्त्यावरील सविंदणे येथे त्यांनी भैरवनाथ अॅग्रो इंजि.वर्क्स अॅन्ड बॉल्डी बिल्डर्स या नावाने दुकान सुरु केले असून चांगल्या दर्जाची अवजारे माफक दरात देत असल्याने शेतकरी त्यांच्याकडे औजारे बनवून घेण्यासाठी गर्दी करू लागले आहे. त्यामुळे त्यांनी या व्यावसायातून मांडलेला हा जीवनप्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
शेतकऱ्यांच्या औजांरासाठी नवीन जुगाड करणारे किठे बंधू हे अगदी कमी खर्चात शेतकऱ्यांना परवडेल अशी औजारे तयार करुन शेतकऱ्यांना कमी खर्चातील औजारे फायदेशीर ठरत आहे. त्यांच्या नावीन पुर्ण उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शहराकडे न जाता ग्रामीण भागात उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वडील परपरांगत वेल्डींग व्यवसाय करत होते. आम्ही दहावीनंतर वेल्डींग व्यवसायात शेती उपयोगी औजारे बनवण्याच्या विचार केला. आम्ही दोघा भावांनी अथक परीश्रम घेत चांगली औजारे बनवण्यात यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ होत आहे..