आज दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी परतुर गेस्ट हाऊस येथे वंचित बहुजन आघाडी ची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीसाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक्ष मा.परमेश्वर खरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष रोहनजी वाघमारे, जिल्हा महासचिव शफिक अत्तार, त्याचप्रमाणे परतुर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मा.रविंद्र भदर्गे,यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शहर अध्यक्ष राहुल नाटकर, एडवोकेट सुरेश काळे, तालुका उपाध्यक्ष शोएब भाई पठाण,तालुका उपाध्यक्ष महादेव पैठने सचिव संकेत प्रधान सहसचिव सलीम शेख सदस्य संदीप मोरे अजर पटेल त्याचप्रमाणे घनसावंगी तालुक्यातील लहुजी धाईत, देविदास भाई कोळे,परमेश्वर खरात,मिलिंद शिंदे, बाळासाहेब सोनवणे,समाधान तोडके, सतीश पटेकर हे उपस्थित होते त्याचप्रमाणे येणाऱ्या सात नोव्हेंबर 2022 चा आष्टी येथील वंचित बहुजन आघाडीचा सर्कल मेळावा मा. रोहन जी वाघमारे यांच्याकडून आयोजित केला असून आगामी निवडणुका ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील या अनुषंगाने एससी ,एसटी ,ओबीसी मायक्रो ओबीसी यांचे समीकरण कसे जुळवता येईल त्यासाठी हा सर्कल मेळावा आयोजित केलेला आहे यासाठी परिसरातील व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी तील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहायचं आहे याद्वारे बोलत असताना त्यांनी असे सांगितले.
परतूर तालुका येथ वंचित बहुजन आघाडी च्या चार तालुक्यातील पदाधिकारी यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह परतूर येथे पार पडली
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/10/nerity_1ed090b5c13582142313fe61f3ff0758.jpg)