शिरुर: आण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश युवराज शिंदे या युवकाने आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरुंदळे याला फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आरोपी माऊली करंदळे याने चिडून फिर्यादी गणेश शिंदे याच्यावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 28) रोजी सायंकाळी 6:30 ते 07 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याची मुले पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी आण्णापुर ग्रामपंचायत कार्यालय येथे गेलो असता त्याच गावातील माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरंदळे रा. आण्णापुर (ता. शिरुर) हा मोठमोठ्या आवाजात फटाके फोडत असताना फिर्यादीची दोन्ही मुले घाबरुन रडू लागल्याने फिर्यादीने आरोपीला पाणी भरल्यानंतर फटाके फोड असे बोलल्याने तुझ्या बापाची जागा आहे का? मी इथेच फटाके फोडणार असे म्हणून घरातील धारदार चाकूने फिर्यादीने उजव्या कानाच्या मागील बाजूस डोक्यावर हातावर सपा सपा वार करुन तुला लय मस्ती आली तुला आज संपवतो असे म्हणून फिर्यादीला जीवे मारण्याच्या प्रयत्न केला आहे.
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद दाखल झाली असून पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास -पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे. शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत जमिनीच्या, ठेकेदारीच्या वादातून अनेक गंभीर गुन्हे वारंवार घडत आहे.आरोपींना जरब बसवण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.