महाराष्ट्र,आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये आपल्या धार्मिक विचाराने लोकांना जीवन जगण्यासाठी लागणारी वैचारीक शिदोरी देणारे *गुरूवर्य श्री.लक्ष्मणअप्पा महाराज हंगीरगेकर* यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन गुरुवर्य लक्ष्मणअप्पा यांच्या 26 वर्ष पूर्ण होऊन 27 व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहेत.
त्यानिमत्ताने जिल्हा परिषेद कन्या शाळा,मधील ज्या आई वडिलांची मुलाना शिकविण्याची परिसथिती नसते अशे असे विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असतात. *श्री.लक्ष्मणअप्पा महाराज हंगीरगेकर* यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके पेना वाटप करण्यात आले व तसेच शाळेचा जीर्णोद्धारासाठी 11000 हजार रुपये देण्यात आले.
लक्ष्मण आप्पा यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात प्रगती कशी करावी आपल्या हिंदू धर्माची संस्कृती कशी जपली पाहिजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे.
कार्यक्रमाचे आयोजन- अॅड.चक्रेश पाटील बनाळीकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान, प.समिती सभापती मारुती पाटील कागेरू, व शाळेसाठी नेहमी सहभाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते भगवान दादा कांबळे,विजय स्वामी मांजरमकर, मनसे तालुकाध्यक्ष कावडे पाटील,सर्व मित्र परिवार,शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते..