रत्नागिरी जिल्हा न्यायालयात 'तारीख पे तारीख'ला कंटाळलेल्या एका तरुणाने न्यायालयातच धिंगाणा घातला. समजावून देखील तरुण समजत नसल्याने अखेर त्या तरुणाला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सविस्तर घटना अशी की, रत्नागिरी कोकण नगर येथील तरुणाला एका खटल्यात साक्षीदार म्हणून तारखेला जावं लागत होतं. मात्र तिथे पुन्हा तारीख मिळाल्याने त्याने गोंधळ घातला. एवढा गोंधळ घातला की कोर्टातील सारा परिसर दणाणून गेला. सारे त्याच्याकडे बघत होते. मात्र तो काही केल्या थांबत नव्हता. सिराज समीर रणदिवे (३२, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. खटल्याची सुनावणी लांबणीवर पडत असल्याने संतापलेल्या सिराजने न्यायालय परिसरात शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जोरदार आरडाओरडा केला. त्याच्या गोंधळाकडे वकील वर्गांसह न्यायालयात आलेले लोक पाहत होते. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वारंवार समजावून ऐकत नसल्याने शेवटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सिराजला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११० व ११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Meghalaya ranked as one of the top performing States in the implementation of Jal Jeevan Mission: Chief Minister Conrad K Sangma
Shillong: Meghalaya has been ranked as one of the top performing States in the implementation of...
অস্বাভাৱিক বিদ্যুৎৰ মাচুল বৃদ্ধি সম্পৰ্কে যুৱ ছাত্ৰ পৰিষদৰ সম্পাদকৰ প্ৰতিক্ৰিয়া।
অস্বাভাৱিক বিদ্যুৎৰ মাচুল বৃদ্ধি সম্পৰ্কে যুৱ ছাত্ৰ পৰিষদৰ সম্পাদকৰ প্ৰতিক্ৰিয়া।
Maharashtra: कांग्रेस को बड़ा झटका, दिग्गज नेता बालासाहेब थोराट का इस्तीफा
इस साल 9 राज्यों में होने जा रहे विधानसभा चुनाव से पहले कांग्रेस को बड़ा झटका लगा है. महाराष्ट्र...
Chugh fires Congress for politicising Lord Ram function. (Cong. leaders degrading symbol of national faith)
BJP national general secretary Tarun Chugh today lambasted Congress leaders including Rahul...