गेवराई (प्रतिनिधी) शासनाच्या शेती विषयक विविध योजना, बियाणे, औषधे आदींसह विविध प्रकल्पांच्या कामांसाठी गेवराईच्या कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी सातत्याने होतांना दिसुन येते. या मुळे गेवराई कृषी कार्यालयात सतत खळबळ उडाल्याचे चित्र पाहण्यास मिळते. केव्हाही गेले तरी दुपारच्याक्षणा पर्यंत या कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यांसह कोणत्याही विभागाचा अधिकारी उपस्थित नसल्याचे आणेक वेळा दिसून आलेले आहे. गेवराई कृषी कार्यालयाची वाताहत झाल्याचे चित्र असुन अधिकारी कुठे गायब होतात? या बाबत तर्कवितर्क चर्चा असुन गेवराईतील राजकिय गटबाजी प्रमाणे तालुका कृषि कार्यालयातील कर्मचारी वर्गातही गटबाजी आसल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई कृषी कार्यालयातील कारभार ठप्प झाला असून ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांना रोजच ये-जा करावी लागत आहे. दरम्यान, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन केला असता ते फिल्डवर असल्याचे सांगतात, मात्र कार्यालयातील विविध विभागात कार्यरत असलेले अधिकारी, लिपिक, कनिष्ठ लिपिक कार्यालयात आढळून येत नाहीत. अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यलयीन सुटी न घेता दोन दोन दिवस गैर हजर आसल्याची चर्चा कार्यलयीन परिसरात होतांना एैकण्यास मिळते. कर्मचारी व अघिका-यांच्या दांडी मारो धोरणामुळे तर अनेक शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, काही शेतक-यांच्या म्हणन्यानुसार या कार्यालयात जाऊन पहाणी व चौकशी केली असता एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी येथे आढळून येत नाही. कार्यालयातील सर्व खुर्च्या रिकाम्या दिसुन येतात. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दालन बंदच आसल्याचे आणेक वेळा दिसुन आलेले आहे. कार्यालय प्रमुख, तालुका कृषी अधिकारी वडकुते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या मोबाईलवर संपर्क होऊ शकत नसल्याचे शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांना वा-यावर सोडणा-या कृषी कार्यालयाकडे आमदार पवार लक्ष देतील काय ?
गेवराई तालुक्याचे कार्य सम्राट आमदार लक्ष्मण पवार हे आ़धुन मधुन कृषि कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांच्या बैठका घेत आसलेतरी या ठिकाणी कार्यरत असलेले तालुका कृषि अधिकारी वडकुते यांचा कर्मचा-यावर वचक व वाच नसल्याचे शेतक-यांच्या बोलन्यातुन जानवते. वडकुते यांच्या आदेशाला सांगळे नावाचे गृहस्त व ईतर कर्मचारी केराची टोपली दाखवत आसल्याने शेतकऱ्यांची फरफट व फजीती होत आसल्याचे बोलल्या जाते. शेतकरी कृषी कार्यालयात आल्यावर अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नसतात. फोन केला तर फोन लागत नाही. लागलाचतर सांगतात फिल्डवर आहे. या मुळे गैर हजरी कर्मचा-यांचे स्टिंग ऑपरेशन होने शेतकऱ्यांच्या दृष्टिने महत्वपूर्ण असुन विध्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी शेतकऱ्यांसाठी स्टिंग ऑपरेशनचे पाऊल ऊचलावे आशी अपेक्षा व मागणी शेतकऱ्यातुन व्येक्त केली जात आहे.