परतूर शहरामध्ये होत असलेल्या बोगस सिमेंट काँक्रिट रस्ते हे सामाजिक कार्यकर्ते योगेश( योगी ) प्रधान यांना कळताच त्यांनी कामाची पाहणी करून तक्रार केली की वार्ड क्रमांक पाच सन्मित्र कॉलनी परतुर येथील श्री तनपुरे यांचे घर ते स्वप्ननगरी पर्यंत होत असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम हे नियमबाह्य बोगस तसेच निष्कृष्ट दर्जाचे होत असून सदरील कामे तात्काळ थांबविण्यात येऊन तसेच संबंधित काम चे शासकीय देयके थांबविण्यात यावे व संबंधित शाखा अभियंता यांच्यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी केलेल्या कार्यवाहीचे लेखी स्वरूपात उत्तर द्यावे अन्यथा आपल्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची संबंधित अधिकाऱ्याने नोंद घ्यावी आंदोलन दरम्यान काही हानी झाल्यास याची सर्वसी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील याची गांभीर्याने दखल घ्यावी असा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश ( योगी ) दादराव प्रधान यांनी दिला आहे उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या सागर आवसरमोल सागर भालशांकर . सिद्धांत अवसरमोल
*परतुर येथील वार्ड क्रमांक पाच सन्मित्र कॉलनी येथे होत असलेल्या तनपुरे यांच्या घर ते स्वप्ननगरीपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम हे नियमबाह्य बोगस व निषकृष्ट दर्जाचे होत आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश प्रधान यांनी केला आहे
