संभाजीनगर: दोन कारच्या भीषण अपघतात चार जण जागीच ठार झाल्याची घटना गंगापूर रोडवरील कायगावजवळ घडली आहे..
संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव जवळ स्विफ्ट आणि वॅगन आर कार एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर मृत आणि जखमींना गंगापूर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर औरंगाबाद महामार्गावरील नवीन कायगाव येथे रात्री साडेनऊ दरम्यान एका स्विफ्ट कारमधून काही लोक नगरकडून औरंगाबादकडे जात होते. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडर चढून विरुद्ध दिशेला जाऊन औरंगाबादहुन नगरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगन आर कारला धडकली.
या अपघातात बजाज नगर येथील स्विफ्ट कार मधील चार जणांचा जागेवर मृत्यू झाला. यामध्ये रावसाहेब मोटे सुधीर पाटील, महानगर रतन बेडवाल यांच्यासह एकाचा समावेश आहे. तर दुसऱ्या गाडीतील शशीकला कोरट, सिध्दांत जंगले, छाया हेमंत जंगले आणि शकुंतला जंगले राहणार अमरावती हे गंभीर जखमी झाले जखमींना नेवासा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तर मृत झालेल्या चार जणांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.