नाशिक: दहा महिन्यांच्या चिमुकलीवर गरम पाणी सांडलं आणि त्यात ती प्रचंड होरपळल्याने गंभीररीत्या भाजलेल्या दहा महिन्यांच्या कोवळ्या जीवावर तीन दिवस उपचार सुरु होते. पण तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. ही दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. या चिमुकलीच्या मृत्यूने तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसला आहे. चिमुकलीच्या मृत्यूबाबत कळताच तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
नाशिक येथील गंगापूर नाका भागात ही धक्कादायक घटना घडली. आवेरा शुभम इंगळे ही अवघ्या दहा महिन्यांची चिमुकली. आवेराच्या जन्माने इंगळे कुटुंबात आनंद संचारला होता. चिमुकल्या आवेराने घरात किलबिलाट झाला होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होत. आवेरा इंगळे या चिमुकलीच्या अंघोळीसाठी पाणी गरम करण्यात आल होत. हे अंघोळीसाठीच कडकडीत गरम पाणी बाथरुममध्ये काढून ठेवलं गेलेल. पण याच गरम पाण्याने आवेराचा घात गेला.
बाथरुममध्ये काढून ठेवलेल गरम पाणी आवेराच्या अंगावर सांडल आणि अनर्थ घडला. आवेरा अंगावर गरम पाणी सांडल्यामुळे प्रचंड भाजली गेली. तिच कोवळ शरीर गंभीररीत्या जखमी झाल. गरम पाण्याने काळीज पिळवटून टाकावा असा आक्रोश आवेराने केला. तिच्या रडण्याच्या आवाजाने घडलेला प्रसंग लगेचच कुटुंबीयांच्या लक्षात आला.
इंगळे कुटुंबीयांनी आवेराला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु होते. आवेराचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची शर्थ केली जात होती. दरम्यान, मृत्यूशी सुरु असलेली आवेराची झुंज अधिकच कठीण होत गेली होती. तीन दिवस दहा महिन्यांची आवेरा मृत्यूशी झुंजली. पण तिची झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवारी तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.