दिल्ली: दिल्लीतील मेहरौली येथे श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा आरोप आफताबवर होत असून या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. श्रद्धा खून प्रकरणात हत्येच्या रात्री काय घडलं? ज्यावरुन वाद इतका वाढला की, आरोपी आफताबने राक्षस बनून श्रद्धाची हत्या केली. याबाबत खुद्द आफताब पूनावालाची कबुली समोर आली आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
एकमेकांना धोका देत असल्याच्या संशयावरुन रोज दोघांचं भांडण व्हायचं. मात्र, ज्या दिवशी हत्या झाली, त्यादिवशी भांडणाचं खरं कारण होतं, की घराचा खर्च कोण उचलणार. मुंबईहून इकडे सामान कसे हलवणार? हत्येच्या रात्री श्रद्धा आणि आफताब यांच्यात घरखर्च आणि सामानाच्या शिफ्टिंगवररुन भांडण झाल्याचं आफताबने उघड केलं आहे. एवढंच नाही तर याआधीही एकमेकांची फसवणूक केल्याच्या संशयावरून त्यांच्यात अनेकदा भांडणं होत असत. आफताब अमीन पूनावाला याने आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने दक्षिण दिल्लीच्या छतरपूर परिसरात फेकल्याचा आरोप आहे.
पोलीस तपासात असं समोर आलं की,18 मे रोजी श्रद्धा आणि आफताबमध्ये भांडण झालं होतं, त्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, 18 मे रोजी या जोडप्यामध्ये झालेली भांडणं ही काही पहिली वेळ नव्हती. या दोघांमध्ये तीन वर्षांपासून भांडण सुरू होतं. एएनआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी सांगितलं की, '18 मे रोजी मुंबईहून घरगुती सामान आणण्यावरून दोघांमध्ये भांडण झाल. घराचा खर्च कोण उचलणार आणि सामान कोण आणणार यावरून भांडणं व्हायची. याचा आफताबला खूप राग आला. 18 मे रोजी रात्री आठच्या सुमारास दोघांमध्ये भांडण सुरू झालं. भांडण इतकं वाढलं की आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला.