रत्नागिरी : टिव्हीवर दाखवण्यात येत असलेल्या डिस्कव्हरी चॅनेलची टीम रत्नागिरीत दाखल झाली आहे. त्यांनी रत्नागिरीचे तोंडभरुन कौतुक केले. मात्र रस्त्यांवरील खड्डयांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताचं देशभर कौतुक होतंय. पर्यटकांनाही आकर्षण वाढलं आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना प्रचंड पर्यटकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 सोमवारी सायंकाळी परेशातून 34 आलिशान गाडया रत्नागिरीत आल्या होत्या. या गाडयांमधून टीव्हीवर प्रसिध्द असलेल्या डिस्कव्हरीची टीम रत्नागिरी आली होती. माळनाका येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर या गाडया थांबल्या होत्या. हे पर्यटक ऑस्ट्रेलिया, जर्मनी, तुर्की अशा देशातून आले होते. ते 7 देश फिरले तेथील रस्ते उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतच्या प्रवासातील खड्डयांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे रस्ते असल्याचे त्यांनी म्हटले. या रस्त्यांवरुन गाडी चालवताना अक्षरशः हाडे खिळखिळी झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रत्नागिरीतील अनेक पर्यटन स्थळे त्यांना पहायची होती मात्र रस्त्यांवरील खड्डयांमुळे त्यांनी पर्यटन स्थळांना भेटी देणे टाळले. राजकारण्यांनी रस्त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, कोकण म्हणजे स्वर्गसुख आहे. निसर्गाचा हा ठेवा असाच टिकून रहावा असे म्हणत येथे नंदनवन नांदते असेही ते म्हणाले. मात्र रस्ते चंद्राच्या खडडयांपेक्षा जास्त उंच व सखल असल्याचे त्यांनी म्हटले. खडडयांमुळे पर्यटक आणि पर्यटनावर परिणाम होतो त्यामुळे राजकारण्यांनी याकडे डोळसपणे पहायला हवे.

1 ऑगस्टपासून त्यांनी 7 देशांच्या फिरतीला सुरुवात केली. पर्यटनदृष्टया भारत देशाकडे पाहून त्यांनी भारतात आगमन केले. वाघा बॉर्डर करुन ते ऑस्ट्रेलियातील गाडयांसह भारतात दाखल झाले. राजस्थान, हरियाणा, गुजरातमार्गे, महाराष्ट्रात औरंगाबादला दाखल झाले. त्यानंतर वेरुळ, अजिंठा लेणी, मुंबई नरिमन पॉईंग, गेट वे ऑफ इंडिया, ओबेरॉय हॉटेल, ताज हॉटेल आदी विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर ते मुंबई गोवा महामार्गाने रत्नागिरीत दाखल झाले. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याचे त्यांनी म्हटले.

पर्यटकांनी स्वतः खडडयांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याने आता आणखी काय दाखले या रस्त्यांविषयी द्यायला हवेत... रस्त्यांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करुन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे तरच येणारा पर्यटक इथे आनंदाने राहिल आणि पर्यटनाला चालना मिळेल. लोकप्रतिनिधींनी याकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवे.