साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी दहावी-बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 25 जुलैपर्यंत अर्ज करावा.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाने याबाबत आवाहन केले आहे. त्याचबरोबर महामंडळाच्या अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या मातंग समाज व तत्सम पोटजातीतील विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर छायाचित्र लावून अर्ज करावा.
अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबत पुराव्याबाबतच्या स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती जोडाव्यात. अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हे क्रमांक 103, 104, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे-06 या कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह 25 जुलैपर्यंत सादर करावा.