केज :- केज येथे एका पत्त्याच्या क्लब वर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका पत्र्यांच्या शेड मध्ये दहा जुगारी हे तिरर्ट नावाचा जुगार खेळताना अढळून आले. पोलिसांनी त्यांच्या कडून मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।

या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना गुप्त माहिती मिळाली की, केज येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनिल टी हाऊसच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालू आहे. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांचे अधिनिस्त अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते व पोलिस नाईक शमीम पाशा यांना सोबत घेऊन शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रात्री ९:३० वा. सदर ठिकाणी अचानक धाड टाकली. तेव्हा तेथे केज येथील सुरेश बापु काळे वय (३२ वर्षे) रा. क्रांती नगर, अजिम नजमोद्दीन ईनामदार वय (३०वर्ष) रा. रोजा मोहल्ला, बाळू अर्जुन गाढवे वय (४० वर्षे ) रा. अहिल्यादेवी नगर, दिपक खंडू काळे वय (२२ वर्षे) रा . कानडी रोड, ईरफान कश्मीर सय्यद वय (२० वर्षे) रा. क्रांती नगर, ईसाक रज्जाक शेख वय (२४ वर्षे) रा. कोकीसपीर, कानडी रोड, रामभाऊ नारायण चांदने वय (३०वर्ष) रा. समर्थ नगर, रामेश्वर दत्तात्रय राऊत वय (४२ वर्षे ) रा. लोंढे गल्ली, अमीर शहामोद्दीन ईनामदार वय (३२ वर्ष) रा. रोजा मोहल्ला, आणि कलीम अहेमद सय्यद वय (४२ वर्ष) रा. अजीजपुरा, केज असे दहा जुगारी आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून नगदी रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असे एकूण ३३ हजार ३३० रु. मुद्देमालासह जप्त केले.

या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांच्या फिर्यादी वरून सुरेश बापु काळे, अजिम नजमोद्दीन ईनामदार, बाळू अर्जुन गाढवे, दिपक खंडू काळे, ईरफान कश्मीर सय्यद, ईसाक रज्जाक शेख, रामभाऊ नारायण चांदने, रामेश्वर दत्तात्रय राऊत, अमीर शहामोद्दीन ईनामदार आणि कलीम अहेमद सय्यद या दहा जुगाऱ्या विरुद्ध गु. र. नं. ५२४/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.