बीड: ज्या नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचा खुलासा आता झाला आहे. चक्क पत्नीनेच पती आवडत नव्हता म्हणून त्याचा गळा आवळला. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे ही घटना घडली आहे.
पांडुरंग चव्हाण यांचं शितल नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. परंतु लग्न झाल्यापासून शितल पतीला कायम धुसफूस करायची. तू मला आवडत नाही, असं म्हणायची. एकेदिवशी त्याचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे नातेवाईकही संतप्त झाले होते. पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी राडा घातलेला. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली.
पती आवडत नसल्याने शितलनेच पतीचा गळा आवळून खून केल्याचं स्पष्ट झाल आहे. पत्नीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. गेवराई पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी शितलविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पांडुरंग चव्हाणच्या आईने याबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतरच हा प्रकार उघड झाला.