खेड: लोटे एमआयडीसी मधील एका कंपनीत स्फोट झाला आहे. फेब्रिकेशनचे काम चालू असताना सॉलवंट केमिकलने पेट घेतला. या दुर्घटनेत कंपनीत काम करणाऱ्या 10 कामगार होरपळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

लोटे एमआयडीसीमधील डीवाईन केमिकलमध्ये ही दुर्घटना घडली. यानंतर सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच याप्रकरणी घटनास्थळी पोलीस आणि एमआयडीसीचे अधिकारी दाखल झाले आहेत.