सोलापूर-प्रहार संघटनेच्या वतीने सोलापुरात शेकडो किलो बुंदी लाडू वाटप करण्यात आली आहे.देशातील पहिले व महाराष्ट्र राज्यातील पाहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्याने अपंग संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करत आहेत.सोलापुरातील प्रहार अपंग संघटनेच्या वतीने शेकडो किलो बुंदी लाडू वाटप करून अपंगानी जल्लोष साजरा केला आहे .गेल्या पंचवीस वर्षांपासून दिव्यांग बांधवांची होणारी परवड आता थांबेल असा विश्वास प्रहार संघटनेच्या पदाधिकऱ्यानी व्यक्त केला आहे.
प्रहारमुळेच महाराष्ट्र मध्ये दिव्यांग मंत्रालयाची स्थापना-
भारतात व महाराष्ट्र हजारो दिव्यांग बांधव हे शासनाकडे अनेक मागण्या वेगवेगळ्या मंत्रालयाकडे करत होत्या.महाराष्ट्र राज्यातील अपंगांसाठी प्रहार अपंग सामाजिक संघटना ही कार्य करत आहे.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बचू कडू हे यांनी अनेक वर्षांपासून प्रमुख मागणी करत दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्याकगी मागणी केली होती.ही मागणी मान्य करत महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली आहे.
शेकडो किलो बुंदी लाडू वाटप करून जल्लोष-
सोलापुरातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपंग बांधवाना घेऊन ,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन जल्लोष साजरा केला.शेकडो किलो बुंदी लाडू वाटप करून,अपंग बांधवांचे तोंड गोड केले.यावेळी प्रहारचे जमीर शेख यांनी माहिती देताना सांगितले की,महाराष्ट्र राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होण्यामागे,आमदार बच्चू कडू यांची प्रमुख भूमिका आहे. या मंत्रालयामुळे दिव्यांगांना न्याय मिळाला आहे.