खेड शहरातील महाडनाका येथील सुपर केमिस्ट या औषधाच्या दुकानाच्या शेजारी राहात असलेल्या युनुस इब्राहिम परकार, रा. शिवाजीनगर, महाड नाका याच्यावर महिलेच्या आयसीएससी बँकेच्या विमा पॉलिसीची रक्कम रूपये ७५ हजार रूपये व २५ हजारसचे चेक फिर्यादीच्या स्वतःच्या बडोदा बँकेच्या खात्यात जमा करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती खेड पोलिसांनी बुधवारी दिली.
याबाबत खैरूनिस्सा इब्राहिम कादरी, वय ३६ रा. महाडनाका, हमदुले चाळ, खेड यांनी येथील पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.