परभणी (प्रतिनिधी)
रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरज लक्षात घेऊन गंगाखेड विधानसभेत कायापालट करीत असलेले कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांची परभणी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंमलबजावणी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. तसे पत्र पालकमंत्री ना.तानाजी सावंत यांनी आ.डॉ. गुट्टे यांना नुकतेच बहाल केले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ अंतर्गत रस्त्यांची निवड करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा स्तरावर संबंधित जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून दि. २६ सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये मा. पालकमंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची या समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे हे सातत्याने जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन काम करतात. त्यामुळे मतदार संघातले वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. विविध विभागाशी भेटून जास्तीत-जास्त निधी मिळविण्यात सुध्दा त्यांचा हातखंडा आहे.
रस्ते विकास आणि अंमलबजावणी या विधायक कामासाठी माझी निवड करुन पालकमंत्री ना.तानाजी सावंत यांनी दाखविलेला विश्वास खूप काही सांगणारा असल्याची भावना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या निवडीमुळे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मतदार संघातील व्यापारी, शिक्षक, कर्मचारी, यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.