औरंगाबाद : मंत्री संदीपान भुरे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे , अशी तक्रार युवराज शिवाजीराव चावरे या तरुणाने ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली आहे . मात्र , यावर अजून गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते . याप्रकरणी संदीपान भुरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला . मात्र , तो उपलब्ध झाले नाहीत . चावरे हे पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवासी असून , ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत . आमच्याविरोधात का राजकारण करतोस म्हणून भुमरे यांनी धमकी दिली आहे . याप्रकरणी योग्य न्याय नाही मिळाल्यास आपण आत्मदहन करू , असा इशाराही त्यांनी दिला आहे . धमकीचा कॉल केला युवराज चावरे यांनी याबद्दल प्रसारमाध्यमांशीही बोलले . ते म्हणाले की , मला सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा व्हॉटसअप ऑडिओ कॉल आला होता . त्यांनी त्यामध्ये मला धमकी दिली . काल आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या जंगी सत्काराचे पाचोड येथे आयोजन केले होते मनात धरून त्यांनी हा कॉल केला . अश्लील भाषेत शिवीगाळ चावरे म्हणाले की , भुमरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली . धमकावले देखील . त्यांनी मला विचारले की , तू आमच्याविरोधात का राजकारण करतोस . आमच्याविरोधात का अशा पोस्टी सोडतोस . मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो . मात्र , ते कुठल्याही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते . त्यांनी मला सरळ अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली . त्यानंतर त्यांनी तू कसे राजकारण करतो , कसा पाचोडला येतो , तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवतो , अशी धमकी मला दिली . तुला बघून घेईल म्हणाले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાણીધરા ગામે મેરી માટી મેરા દેશ અને 74 માં વન મહોતસવ નો કાર્યકમ યોજાયો
માળીયા હાટીના તાલુકા ના પાણીધરા ગામે મેરી માટી મેરા દેશ અંતર્ગત અને 74 માં વનમહોતસવ નો કાર્યક્રમ...
কণ কণ ছাত্ৰ ছাত্ৰীৰ মুখ্মন্ত্ৰীলৈ আহ্বান মামা আমাক দলঙ এখন লাগে, স্কুল যাবলৈ কষ্ট হৈছে।
হয় দেশ স্বাধীন হোৱাৰ ৭৫ বছৰ হ'ল, কিন্তু আজিও বিদ্যালয়লৈ আহিব লগা হৈছে টিউবৰ সহায়ত। আৰু এইয়াই...
কেনেদৰে সংগীত চৰ্চাৰে নিজকে আগবঢ়াই নিয়াৰ চেষ্টা কৰিছে লক্ষ্যজ্যোতি মৰানে। কাৰ আশীষ বিচাৰিলে?
কেনেদৰে সংগীত চৰ্চাৰে নিজকে আগবঢ়াই নিয়াৰ চেষ্টা কৰিছে লক্ষ্যজ্যোতি মৰানে। কাৰ আশীষ বিচাৰিলে?
World Book Day 2024: करियर ही नहीं, सेहत को भी चमकाती है किताब पढ़ने की आदत, मिलते हैं ये 4 बेमिसाल फायदे
किताब पढ़ने की आदत न सिर्फ आपके भविष्य को बेहतर बनाती है बल्कि सेहत को भी बेशुमार फायदे पहुंचाती...
मुंडला मे जिला कलेक्टर की जनसुनवाई, रात्रि चौपाल से पूर्व दी वित्तीय साक्षरता की जानकारी
दिगोद. सुल्तानपुर के मुंडला ग्राम पंचायत में मंगलवार रात्रि जिला कलेक्टर कोटा डॉ रविंद्र गोस्वामी...